महाविद्यालयातील मराठी विभाग सन १९७१-७२ पासून विद्यादानाचे पवित्र कार्य अव्याहत करीत आहे. या विभागात कार्यतत्पर व व्यासंगी प्राध्यापकांची परंपरा आहे. श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विघमान कार्यध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळूंखे, डॉ. स.ग. यादव, प्रा. स.प. मिसाळ, प्राचार्य शामराव चव्हाण यांचा पत्नी प्रा. सौ . शशिकला चव्हाण, प्रा. गो.ल. गबाळे ,प्रा. माधव माळी यांच्यासारख्या व्यासंगी व विघार्थीप्रिय प्राध्यापकांची ही परंपरा आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिक्षण विषयक ध्येयधोरणानुसार अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने या शाखेतील व विभागातील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता कार्यकर्ता राहिला आहे.
या प्रामाणिकपणाचे व निष्ठेचे फलित समाजामध्ये यशस्वीपणे जीवन जगणारे या विभागाचे सुसंस्कारी विघार्थी हेच आहे. यामध्ये आश्रमशाळा हुन्नर ता. मंगळवेढाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एकनाथ होळकर, जि .प. प्राथमिक शाळा महाविद्यालय मिरज येथील मराठी विभाग प्रमुख कु. लक्ष्मी पवार, श्री. रामराव विद्यामंदिर जत येथील श्री. पांडुरंग साळूंखे आश्रमशाळा डिकसळ ता.सांगोला येथील श्री. आनंदा निळे, श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज पांचगणी येथील वामनराव सरगर तसेच वनिता शिंदे, श्री. अप्पासाहेब कोकरे, बंडू गणपती काशीद व जयंत पवार मुंबई हायकोर्ट वकील, डॉ. संभाजी शिंदे पोलीस विभागातील सुप्रिया सकट, राहुल कांबळे, चांगदेव खर्जे अशा कितीतरी जणांचा समावेश आहे.
आजही हा विभाग शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी रुजविलेल्या आदर्शांना प्रमाण मानून व ग्रामीण भागातील विधार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत आहे.
महाविद्यालयांतर्गंत मराठी विभाग विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व गुणवत्ता वाढ यासाठी वर्षभर कार्यरत असतो. शौक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच बी. ए. भाग १ व बी. कॉम. भाग १ मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेतु अभ्यासक्रम (Bridge Course) उपक्रम राबविला जातो. त्यातून महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीमध्ये प्रविष्ठ होणऱ्या विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान आजमावले जाते. त्यासाठी त्यांची सदर अभ्यासक्रमावर चाचणी घेऊन प्रगत व अप्रगत विद्यार्थी शोधले जातात व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या मार्गदर्शनाची सोय केली जाते.
शैक्षणिक वर्षामध्ये सर्व वर्गातील मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांच्या आकस्मिक चाचणी, घटक चाचणी, पुस्तक परीक्षण, भित्तीपत्रिका प्रकाशन, चर्चा सत्र व प्रकल्प लेखन अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानात भर घातली जाते. त्याच बरोबर दि. १ ते १५ जानेवारी या कालावधित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागाने साजरा केला जातो. या कालावधित काव्य वाचन, काव्यलेखन, निबंधलेखन, वक्तृत्व, कथालेखन, भित्तीपत्रिका, शब्दकोडे, सुंदर हस्ताक्षर, मराठी स्वाक्षरी, वाचनकट्टा या उपक्रमाबरोबरच महाराष्ट्राची लोकधारा ही ध्वनी चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविली जाते.तसेच दि.२७ फेब्रुवारी हा कवि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्त एखद्या ज्येष्ठ विचारवंताचे व्याख्यान आयेजित केले जाते. दरवर्षी निसर्गरम्य ठिकाणी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात येते. की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त लेखनाची प्रेरण मिळेल
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना या पदवी प्राप्ती बरोबरच व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण करता यावा या उद्देशाने या विभागामार्फत मुद्रित शोधन (proof reading) हा अभ्यासक्रम राबविला जातो. या शैक्षणिक वर्षामध्ये या अभ्यासक्रमासाठी १९ विद्यार्थी – विद्यार्र्थिंनी प्रवेशित होते. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या कार्यालयांमध्ये व प्रकाशन संस्थांमध्ये मुद्रित शोधक म्हणून विद्यार्थ्याना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
या विभागातून पदवी प्राप्त करुन बाहेर पडणारा विध्यार्थी एक सुजाण व सुसंस्कृत नागरिक कसा घडविला जाईल यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते.
ध्येय vision
1. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून पर्यावरण संवर्धन, स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय आणि प्रेम या मानवी मूल्यांचा आविष्कार करणे.
2. स्त्री सबलीकरण, स्त्री भ्रूण हत्या, धार्मिक स्वातंत्र्य, मानवी हक्क ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, विद्यार्थी स्वावलंबी बनावा यासाठी त्यास जागरुकपणे विविध कौशल्य आत्मसात करुन देणे. तो सुसंस्कृत, आचारशील, विचारशील व कर्तृत्त्वसंपन होण्याचा प्रयत्न करणे.
3. कला, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या विकासाचे श्रेय हे साहित्याचेच आहे. संस्कृतिचा वारसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित करण्याचे कार्य भाषेमुळे होते. व्यक्तिमत्त्व विकासात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून प्रगल्भ अशी भाषा बोलणारा उत्तम, सुजान नागरिक निर्माण करणे.
4. आपल्या कुवतीनुसार साहित्याच्या क्षेत्रामध्ये नैपूण्य प्राप्त करुन देऊन व्यक्तिमत्त्व विकासात भर घालणे.
5. विद्यार्थ्यांच्या वाड्.मयीन अभिरुचीत वाढ करुन सामाजिक बांधिलकी, मानवता, नितीमत्ता, लोकशाही, औद्योगिकता, नियोजन यांचे सजग भान निर्माण करुन देणे.
6. भाषिक कौशल्ये आणि संप्रेषण कौशल्यांचा विकास करत अन्यायाला वाचा फोडत लोकशिक्षण व समाजप्रबोधन, स्वभान व आत्मभान निर्माण करणे
7. मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे.
8 .मराठी भाषेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये विकसित करणे
9. विविध दृकश्राव्य माध्यमाचा व्यावसायिक दृष्टीकोनातून वापर करणेस प्रेरित करणे.
10. साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक जागृती निर्माण करणे
उद्दिष्टये - Objectives
1. वाचन व लेखन कौशल्याचा विकास करुन या अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांचे भावनिक, मानसिक बौध्दिक पातळीवर व्यक्तिमत्त्व समृध्द करणे.
2. भाषा कौशल्याचा विकास करुन नवनिर्मितीस प्रवृत्त करणे. समीक्षात्मक व संशोधनात्मक दृष्ट्या विकास करणे.
3. कलाकृतीचा परिचय करुन देऊन पर्यावरण, मानवी मूल्यसंस्कार व सांस्कृतिकता यांचा परिचय करुन देणे.
4. प्राचीन, शिवकालीन व पेशवेकालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थतीगती लक्षात घेता त्याकाळातील ग्रंथ रचनेचा परिचय व ग्रंथ विशेष यांचे आकलन करुन देणे.
5. भाषा, बोलीचे शब्दविशेष नोंदविणे.
6. मराठी वाड्.मयाच्या इतिहासाच्या अनुषंगाने त्या-त्या काळातील सामाजिक चळवळींचा साहित्यावरील प्रभावाचा अभ्यास करणे.
7. दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखनकौशल्ये आत्मसात करणे.
8. माध्यमलेखनात असणारे साहित्याचे महत्त्व विषद करणे.
9. मराठीचे अध्ययन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना साहित्यातील विविध प्रवाह व प्रकार लक्षात आणून देणे.
10. साहित्य अभ्यासातून जीवन जगण्याची कला विकसित करणे. समाजाकडे डोळसपणे पाहता येण्याची कला विकसित करणे. याकरिता व्यवहार विज्ञान, कार्यालयीन व वाङ्मयीन परिभाषेचे आकलन करुन देणे. माहिती तंत्रज्ञानाचा परिचय करुन देणे.
Programme Specific Outcomes (PSO)
१. मराठी भाषेचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग होईल.
२. प्रमाणभाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे व रूपे यांची ओळख होईल.
3. साहित्याची आकलन, आस्वाद आणि मूल्यमापनाची क्षमता विकसित करण्यास मदत होईल.
४. साहित्याची समीक्षात्मक दृष्टी विकसित होईल.
५. मराठी साहित्याच्या इतिहासाद्वारे विद्यार्थ्यांना साहित्याचा विकासात्मक परिचय होईल.
६. मराठी भाषेच्या देवनागरी लिपीचा विकासात्मक परिचय होईल.
७. मराठी भाषेचे शुद्धलेखन आणि मुद्रित शोधन यासंबंधीच्या नियमांचा परिचय होईल.
८. भाषेच्या विविध कौशल्यांचा परिचय होण्यास मदत होईल.
९. मराठी भाषेच्या वाङ्मयीन परंपरेचा विकास समजण्यास मदत होईल.
|